Sheli Palan Yojana: आता शेळी पालनासाठी सरकार देणार १५ लाख रुपये परेंत SUBSIDY

Sheli Palan Yojana महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आता आपल्या शेतकऱ्यांना तसेच महाराष्ट्रातील नागरिकांना शेळ्यांच्या एका युनिट (१०० शेळ्या ) साठी १५ लाखापरेंतची ५० % SUBSIDY मिळवण्याची संधी आता महाराष्ट्र सरकार देत आहे. आता या मध्ये ग्रामीण तरुण, शेतकरी, महिला, स्वयंसहायता गट यायोजनेचा लाभ घेऊ शकतात. राज्यातील बऱ्याच नागरीकांचा शेती हा पारंपरिक व्यवसाय आहे. शेतीला जोडधंदा म्हणून ते गाय, म्हशी यांचे पालन करत असतात. परंतु शेळी घेण्यासाठी त्यांच्या कडे पुरेसा पैसा उपलब्ध नसतो. त्याचमुळे ते शेळी पालनाकडे ते वळत नाहीत. याचा सर्व समस्यांचा एक विचार करून महाराष्ट्र सरकारने शेळी – मेंढी पालन योजना सुरु करण्याचा हा निर्णय घेतलेला आहे. या योजनेमध्ये इच्छुक लाभार्थ्यांना ५० लाख रुपयांचं कर्ज सरकारच्या माध्यमातून दिले जाणार आहे. ते कशे या बद्दल संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.

Sheli Palan Yojana काय आहे ?

शेती सोबतच पशु पालन हा व्यवसाय ग्रामीण भागासाठी एक मजबूत आधार बनत आहे. कमी खर्च जलद उत्पादन आणि बाजारपेठेत असलेली एक मोठी मागणी यामुळेच शेतकऱ्यांसाठी Sheli Palan एक उपयुक्त व्यवसाय माणूस महत्वाचा ठरतो. या योजनेमध्ये तुम्ही १०० शेळ्यांच्या युनिट साठी तब्बल १५ लाख रुपयापरेंतची सबसिडी मिळवू शकता.

sheli palan yojana 2025 योजनेचे उद्दिष्टे

  • पारंपरिक शेती व्यवसायाला चालना देणे.
  • राज्यात दूध आणि मास उत्पादनात वाढ करणे.
  • पशु पालकांना सामाजिक व आर्थिक मदत करून त्यांना सक्षम करणे.
  • पशु पालकांना शेळी – मेंढी खरेदीसाठी लागणाऱ्या खर्चासाठी या योजनेद्व्यारे मदत करणे.
  • या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण तरुण, शेतकरी, महिला, स्वयंसहायता गट यांना पशुपालन आधारित व्यवसाय सुरु करण्यासाठी आर्थिक मदत देणे.
  • बेरोजगारांना तरुणांना त्यांच्या पायावर उभे करून रोजगार निर्माण करून देणे व त्यांचा आर्थिक विकास करणे.

हाच महाराष्ट्र सरकारच्या या योजनेचा उद्देश आहे.

Sheli Palan युनिट साठी SUBSIDY कशी मिळेल ?

जर का तुम्ही १०० शेळ्या आणि ५ बोकड अशी युनिट सुरु करण्याचा विचार करत असाल तर त्या साठी अंदाजण खर्च जवळजवळ १५ लाख रुपये इतका येतो. आता या खर्चा साठी सरकार तुम्हाला ५०% म्हणजेच ७ लक्ष ५० हजार परेंत सबसिडी देते. आता हि रक्कम दोन टप्यामध्ये तुमच्या बँक खात्यात जमा करू शकता. आता या योजनेचा पहिला टप्पा / पहिला हफ्ता हा प्रकल्प सुरु झाल्यावर मिळतो. तर दुसरा हफ्ता हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर मिळतो.

Eligible Criteria : पात्रता, अटी व नियम

  • तो बाहेरील राज्यातील नसावा.
  • वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे.
  • ९ हजार वर्ग मीटर जमीन असणे आवश्यक.
  • बँकेकढुन कर्ज मजूर करून त्याच पुरावा सादर करणे.
  • पशुपालकाकडे शेळ्यांच्या खाद्याची सुविधा असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार भरतील नागरिक आणि ग्रामीण भागातील राहवाशी असावा.
  • लाभार्त्यांचा Mobile Number Aadhar Card ला Link असणे आवश्यक.
  • अर्जदार अनुसूचित जाती-जमातीचा असल्यास त्याला अर्ज सोबत दाखला देणे आवश्यक.
  • अर्जदाराला पशुपालनाचा अनुभव किंवा अधिकृत प्रशिक्षण प्रमाणपत्र असावे. (असेल तर आवश्यक किंवा आवश्यक नाही).

Sheli Palan Yojana Documents List : आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • पासपोर्ट साईज फोटो
  • बँक पासबुक व खाते क्रमांक
  • जात प्रमाणपत्र (जर लागू असेल तर)
  • जमिनीचे 7/12 उतारा किंवा भाडेकरार
  • शेळी पालन Training Certificate (असल्यास)

How To Apply (Step by Step) : अर्ज करण्याची सोपी पद्धत

  • सर्वात आधी MAHABMS या अधिकृत Website ला भेट द्या.
  • त्यानंतर सर्व आवश्यक माहिती व कागदपत्रे देऊन तुम्ही हा अर्ज भरायचा आहे.

ऑनलाईन अर्जप्रक्रिया

  • Pan कार्ड.
  • आधार कार्ड.
  • KYC Documents.
  • बँक कर्ज मंजुरीचे पत्र.
  • सविस्तर प्रकल्प अहवाल शेळी पालन प्रशिक्षण प्रमाणपत्र (असल्यास).

ऑफलाईन अर्जप्रक्रिया

  • पहिल्यांदा पशुसंवर्धन विभागाला भेट द्या.
  • कृषी विभागातून शेळी पालन योजनेचा अर्ज घ्या.
  • अर्जमध्ये विचारण्यात आलेली संपूर्ण माहिती अचूक व सविस्तर भरा.
  • फॉर्मची पडताळणी झाल्यावर अर्ज जिल्हा स्तरावर मंजूर केला जातो.
  • मंजुरी मिळाल्यावर Subsidy आणि Loan थेट तुमच्या बँक खात्यात जमा होईल.
  • Training व Field Verification प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर Goat Farming सुरू करता येते.

Form सोबत जोडायची आवश्यक कागदपत्रे :

  • राहवाशी दाखला.
  • जातीचे प्रमाणपत्र.
  • राशन कार्ड.
  • जमिनीचा सातबारा.
  • ८ अ उतारा.
  • Passport Size फोटो.
  • उत्पनाचा दाखला.
  • मोबाईल नंबर.

अर्ज भरून झाल्यानंतर पशुसंवर्धन विभागात अर्ज जमा करा.अश्याप्रकारे ऑफलाईन अर्ज प्रक्रिया तुमची पूर्ण होईल.

Sheli Palan Yojana Maharashtra चे फायदे

  • कमी भांडवलात व्यवसाय सुरू करण्याची संधी.
  • महिला व युवकांसाठी स्वावलंबनाचा उत्तम मार्ग.
  • ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती.
  • शेळ्यांमधून दूध, मांस व शेळीचे खत विकून नियमित उत्पन्न.
  • Goat Farming Maharashtra Subsidy मुळे आर्थिक भार कमी होतो.

Sheli Palan Yojana Maharashtra 2025 म्हणजे काय?

ही महाराष्ट्र शासनाची योजना आहे ज्यात शेतकरी व पशुपालकांना शेळी पालन व्यवसायासाठी Subsidy व Loan दिले जाते.

Sheli Palan Yojana मध्ये किती Subsidy मिळते?

SC/ST प्रवर्गासाठी 75% पर्यंत आणि इतर प्रवर्गासाठी 50% पर्यंत Subsidy दिली जाते.

Sheli Palan Yojana साठी कोण पात्र आहे?

महाराष्ट्रातील रहिवासी, वय 18 वर्षांपेक्षा जास्त, शेळी पालनासाठी आवश्यक जागा असलेले, व यापूर्वी Subsidy न घेतलेले अर्जदार पात्र आहेत.

Sheli Palan Yojana ऑनलाइन अर्ज करता येतो का?

होय, जिल्हा पशुपालन विभाग व शासकीय अधिकृत संकेतस्थळावरून Sheli Palan Yojana Apply Online 2025 करता येतो.

या योजनेतून कोणते फायदे मिळतात?

कमी गुंतवणुकीत Goat Farming सुरू करता येते, नियमित उत्पन्न मिळते, महिला व युवकांना रोजगार संधी मिळतात आणि सरकारकडून आर्थिक मदत मिळते.

Leave a Comment