Cast Certificate Document in Marathi: महत्वाची कागदपत्रे

Cast Certificate (जात प्रमाणपत्र) हे भारतात जातीच्या पुराव्यासाठी एक अत्यंत महत्वाचे प्रमाणपत्र आहे. ह्या प्रमाणपत्रा वरून व्यक्ती कोणत्या जातीचा आहे. हे शासकीय पळताळणी वरून प्रमाणित करण्यात येते. तसेच विविध कल्याणकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी व शैक्षणिक प्रवेश, नोकरीतील सवलती, शिक्षवृत्ती, आरक्षण मिळवण्यासाठी हे जात प्रमाणपत्र महत्वाचे आहे. त्यामुळे प्रत्येक वेक्तीने आपले जात प्रमाणपत्र वेळेत तयार करावे.
हे जात प्रमाणपत्र कशे काढावे व काय महत्वाचे doucments या साठी आवश्यक आहे. याबद्दलची सर्व माहिती खाली दिलेली आहे.

Cast Certificate Documents Required :

Cast certificate (जात प्रमाणपत्र) मिळवण्यासाठी अर्ज करतांना लागणारे महत्वाचे कागदपत्रे खालील प्रमाणे. ही कागदपत्रे वेक्तीच्या ओळखीची, पत्त्याची आणि वंशावळीची माहिती खरी असल्याचे पुरावे देतात.


ओळखीचा पुरावा – identity proof
अर्जदारास ओळखीचा पुरावा म्हणून खालील कोणतेही एक दस्ताऐवज आवश्यक आहे.

  • आधार कार्ड ( Addhar Card )
  • मतदान कार्ड ( Election Card )
  • पॅन कार्ड ( Pan Card )
  • पासपोर्ट फोटो ( असेल तर )

Proof of Residency Documents
अर्जदार महाराष्ट्र राज्यातील राहावासी आहे. हे सिद्ध करण्यासाठी खालील दस्तावेज आवश्यक आहे.

  • रेशन कार्ड
  • पाणी बिल किंवा वीज बिल
  • घराचा मालकी हक्काचा कागद
  • भाडेकरार (जर भाड्याने राहत असाल तर)

जन्म प्रमाणपत्र – Birth Certificate
अर्जदाराला आपली जन्म दिनांक व पालकांची नावे सिद्ध करण्यासाठी जन्म प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. नगरपालिकेच्या जन्म नोंद प्रमाणपत्रातुन तुम्ही हे प्राप्त करू शकता.

शाळा सोडल्याचा दाखला – school leaving certificate
School leaving certificate मध्ये सुद्धा जात नमूद केलेली असते. त्यामुळे हा पुरावा देखील सहाय्यक पुरावा म्हणून जोडले जाऊ शकते.

वंशावळ दाखला –
काही वेळा तहसील कार्यालय अर्जदाराच्या कुटुंबाची वंशावळ पळतळणी मागते तेव्हा कुटुंबातील जात प्रमाणपत्राची प्रत जोडणे उपयुक्त ठरते.

Cast certificate apply process (step by step)

Step 1: Visit Aaple Sarkar (maha online) आणि नवीन वापरकर्ता (New User)असल्यास नोंदणी करा. हि नोंदणी Mobile Number किंवा E-Mail च्या माध्यमातून होईल.

Step 2: Login करा. आपली User ID आणि Password टाकून लॉगिन करा.

Step 3: Department Selection Department Selection मध्ये Revenue Department Select करून त्यामध्ये Revenue Service Option निवडावा. व Proceed बटनावरती क्लिक करून Cast Certificate हा पर्याय निवड.

Step 4: नवीन अर्ज भरा फॉर्ममध्ये वैयक्तिक माहिती (नाव, पत्ता, जात, शैक्षणिक/कुटुंब माहिती इ.) अचूक टाका. आवश्यक ते सर्व पर्याय भरा.

Step 5: Document Upload (कागदपत्रे अपलोड करा) ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा व इतर आवश्यक कागदपत्रे डिजिटल स्वरूपात (JPEG / PDF) अपलोड करा.

Step 6: Payment (शुल्क भरा) शुल्क असेल तर आवश्यक ते ऑनलाईन शुल्क भरून Proceed to Next करा.

Step 7: अर्ज सबमिट करा व रसीद/अर्ज क्रमांक जतन करा अर्ज पूर्ण भरून झाल्याची खात्री करा. आणि अर्ज Submit करा. व अर्ज क्रमांक व रसीद आपल्याकडे वेवस्तीत जतन करून ठेवा. पुढे Tracking साठी हे गरजेचे आहे.

Step 8: प्रक्रिया व पडताळणी महसूल/जिल्हा कार्यालय तुमचे कागदपत्रे तपासून पडताळणी करेल. काहीवेळा स्थानिक अधिकारी/ग्रामीण नोंदणीची चौकशी आवश्यक पडू शकते.

Step 9: Certificate Download पळताळणी प्रक्रिया मान्य होताच पोर्टलवरून PDF स्वरूपात आपले Cast Certificate डाउनलोड करा.

जात प्रमाणपत्र मिळायला किती दिवस लागतात?

अर्ज सबमिट केल्यानंतर साधारण 15 ते 30 दिवसांच्या आत पडताळणी पूर्ण होते आणि प्रमाणपत्र डाउनलोडसाठी उपलब्ध होते.

जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी शुल्क किती आहे?

ऑनलाइन अर्ज करताना साधारण ₹20 ते ₹50 इतके शुल्क भरावे लागते. सेवा केंद्रावर अर्ज केल्यास थोडे जास्त शुल्क असू शकते.

जात प्रमाणपत्रासाठी पालकांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे का?

होय. जर अर्जदार विद्यार्थी किंवा अल्पवयीन असेल तर पालकांचे जात प्रमाणपत्र किंवा जात पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक असते.

जात प्रमाणपत्र हरवले तर काय करावे

जवळच्या तहसील कार्यालयात किंवा सेवा केंद्रात जाऊन डुप्लिकेट जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करता येतो. ओळख पुरावा आणि हरवल्याची नोंद आवश्यक आहे.

जात प्रमाणपत्र ऑनलाईन डाउनलोड करता येते का?

होय, Aaple Sarkar Portal वर लॉगिन करून, “My Applications” विभागातून प्रमाणपत्र PDF स्वरूपात डाउनलोड करता येते.

Leave a Comment