Ladki Bahin Yojana हि एक महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेली एक महत्वाची योजना आहे. प्रामुख्याने राज्यातील महिलांना दरमहा आर्थिक मदत मिळावी जेणेकरून घरगुती खर्चसः हातभार लागेल, व महिलांना स्वावलंबी बनवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा रु १५०० इतकी आर्थिक मदत केली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्य सरकारकडून काही पात्रता निकष तसेच नियम व अति लादण्यात आलेल्या आहेत. त्या नेमक्या कोणत्या ते सविस्तपणे खाली दिल्या प्रमाणे…
eKYC का आवश्यक आहे ?
- सरकारला अनेक ठिकाणी डुप्लिकेट अर्ज, चुकीची माहिती किंवा बनावट लाभार्थी सापडले होते.
- यामुळे खरी पात्र महिला वंचित राहत होती.
- eKYC द्वारे आधार कार्ड आणि बँक खाते थेट जोडले जाते ज्यामुळे फसवणूक टाळता येते.
- ही प्रक्रिया झाल्याने पैसा थेट खरी लाभार्थी महिला हिच्या खात्यातच जमा होईल याची खात्री होते.
ladki bahin yojana documents : eKYC साठी आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड (अपडेटेड मोबाईल नंबर लिंक असलेले)
- बँक पासबुक झेरॉक्स
- मोबाईल नंबर (OTP साठी)
- जर मोबाइल नंबर आधारला लिंक नसेल तर जवळच्या आधार सेवा केंद्रात जाऊन अपडेट करणे आवश्यक.
Ladki Bahin Yojana eKYC 2025 – अशी करा eKYC
महाराष्ट्र सरकारने लाडकी बहिण योजनेत एक नवीन अपडेट जारी केला आहे — आता eKYC अनिवार्य करण्यात आले आहे.
| 1. जवळचे CSC (Common Service Center) किंवा महा-ई-सेवा केंद्राला भेट द्या : | आपल्या गावात किंवा शहरात जवळची महा-ई-सेवा केंद्राला भेट द्या |
| 2. आधार कार्ड बरोबर ठेवा : | आधारवरील नांव, जन्मतारीख इत्यादी माहिती बरोबर आहे की नाही तपासा. |
| 3. मोबाईल नंबर आधारकार्डला लिंक आहे का ते तपासा : | जर आधारात मोबाईल नंबर लिंक नसेल तर आधार सेवा केंद्रावर जाऊन अपडेट करावा. |
| 4. OTP पडताळणी : | महा-ई-सेवा केंद्रात आपण दिलेल्या मोबाईल नंबर वरून आधार प्रणालीद्वारे OTP येईल. तो वेवस्थित टाका. |
| 5. बायोमेट्रिक पडताळणी : | फिंगरप्रिंट किंवा आयरिस स्कॅन यापैकी एक पडताळले जाईल. |
| 6. अर्ज क्रमांक मिळवा : | प्रक्रिया पूर्ण झाल्यावर अर्ज क्रमांक (Application ID) दिला जातो. तो आवश्य नोंदवून ठेवा. |
| 7. eKYC पूर्ण झाल्यावर मदत थेट बँक खात्यात येईल : | बँक खाते माहिती बरोबर असल्यास मदत थेट DBT प्रणालीद्व्यारे जमा होईल. |
Ladki Bahin Yojana Eligible Criteria – पात्रता
- अर्जदाराने महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी रहिवासी असणे आवश्यक आहे.
- योजना विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता, निराधार महिला, तसेच कुटुंबातील फक्त एक अविवाहित महिला यांना लाभ देण्यासाठी आहे.
- अर्जदाराचे वय किमान 21 वर्षे आणि जास्तीत जास्त 65 वर्षे असावे.
- लाभार्थ्याच्या नावावर आधार लिंक असलेले स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹2.50 लाखांपेक्षा जास्त नसावे.
महत्वाचे मुद्दे – Bullet Points
- अर्ज भरताना सर्व माहिती आधार प्रमाणे अचूक भरा
- मोबाईल नंबर आधाराशी लिंक असणे आवश्यक
- फक्त एकाच कुटुंबातील एक अविवाहित महिला अर्जदार होऊ शकते
- अर्ज प्रक्रियेत मदत हवी असल्यास जवळच्या CSC केंद्रावर जा
- दरमहा ₹1500 आर्थिक सहाय्य DBT द्वारे थेट बँक खात्यात जमा
Ladki Bahin Yojana 2025 खूप महत्त्वाची आहे. eKYC आजच पूर्ण करा, नाहीतर दरमहा मिळणारे ₹1500 बंद होऊ शकतात. सर्व कागदपत्रे अचूक भरून त्वरित जवळच्या CSC किंवा महा-ई-सेवा केंद्रावर जा आणि तुमचा आर्थिक फायदा सुरक्षित करा!
Note - अर्जदाराने अर्ज भरताना नाव, जन्मतारीख व पत्ता आधार कार्डप्रमाणे अचूक भरावा. बँक खाते व मोबाईल नंबरची माहितीही योग्य असल्यास eKYC प्रक्रिया जलद आणि पारदर्शक होते.
| Visit The Official Portal |
| https://ladakibahin.maharashtra.gov.in/ |

IMPORTANT POST : Sanjay Gandhi Niradhar Yojana
लाडकी बहिण योजनेसाठी eKYC का अनिवार्य आहे?
eKYC अनिवार्य करण्याचे कारण म्हणजे फसवणूक टाळणे आणि पैसे थेट खरी पात्र महिला खात्यात पोहोचवणे. यामुळे योजना पारदर्शक आणि सुरक्षित बनते.
जर मी eKYC वेळेत पूर्ण केले नाही तर काय होईल?
जर eKYC पूर्ण न केले, तर दरमहा मिळणारे ₹1500 आर्थिक सहाय्य थांबवले जाऊ शकते. त्यामुळे त्वरित जवळच्या CSC केंद्रावर प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे.
लाडकी बहिण योजनेचा लाभ पुरुष घेऊ शकतात का?
नाही, ही योजना फक्त महिला लाभार्थींसाठी आहे, जे महाराष्ट्र राज्याचे कायमस्वरूपी रहिवासी आहेत.
लाडकी बहिण योजनेचा पैसे थेट खात्यात जमा होत असल्याचे कसे तपासावे?
अर्ज पूर्ण झाल्यानंतर दरमहा DBT (Direct Benefit Transfer) द्वारे लाभार्थीच्या बँक खात्यात ₹1500 जमा होते. याची पुष्टी बँक पासबुक किंवा मोबाईल बँकिंगद्वारे करता येते.
लाडकी बहिण योजनेचा अर्ज किती वेळा अपडेट केला जाऊ शकतो?
अर्ज एकदा मंजूर झाल्यानंतर अपडेट केवळ महत्वाच्या बदलांसाठी (जसे बँक खाते बदल, मोबाईल नंबर अपडेट) करता येतो.

1 thought on “Ladki Bahin Yojana eKYC 2025 – आजच करा नाहीतर ₹1500 बंद”