Sanjay Gandhi Niradhar Yojana: आता लाभार्थ्यांना रु १५०० ऐवजी २५०० रु हफ्ता मिळणार

Sanjay Gandhi Niradhar Yojana

नमस्कार, Sanjay Gandhi Niradhar Yojana व श्रावण बाळ सेवा निवृत्ती योजनेच्या लाभार्थांसाठी अतिशय महत्वाचा हा लेख आहे.
लाभार्थांसाठी खूप आनंदाची माहिती आहे. 2500 रु हफ्ता हा सर्व लाभार्थ्यांना मिळणार आहे. या बाबतचा GR आता सरकारच्या माध्यमातून प्रसिध्द करण्यात आलेला आहे.

हफ्ता कोणाला मिळणार आहे ?
कधी पासून हफ्ता तुम्हाला मिळणार आहे ?

या बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये सांगितली आहे. लेख शेवटपर्यंत वाचा म्हणजे योजनेबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल.

Sanjay Gandhi Niradhar Yojana व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्त्यांचे अर्थसहाय्य रुपये 1500 वरून रुपये 2500 इतके करणेबाबतचा हा महाराष्ट्र शासनाचा दिनांक 15 सप्टेंबर 2025 हा जी.आर आहे.

Sanjay Gandhi Niradhar Yojana Maharashtra:

संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रवणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे मासिक अर्थसहाय्य रुपये १५००/- वरुन दरमहा रुपये २५०० करण्यास याद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे.
विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण सर्वसाधारण / अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी करण्यात आलेल्या मंजूर तरतूदीमधून करण्यात येईल.सदर अर्थसहाय्यातील वाढ ही संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रवणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व संलग्न खात्यात करण्यात येईल.

योजनेचे उद्दिष्ट

या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे निराधार, अपंग, विधवा, अनाथ, ट्रान्सजेंडर आणि गंभीर आजाराने त्रस्त व्यक्तींना दरमहा निश्चित रक्कम देऊन त्यांचा उदरनिर्वाह सुलभ करणे.

Sanjay Gandhi Niradhar Yojana Benefits: लाभ

  • पात्र व्यक्तींना दरमहा ₹1,500 अनुदान मिळते.
  • २०२५ पासून अपंग व्यक्तींना हे अनुदान ₹2,500 करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
  • रक्कम थेट DBT (Direct Benefit Transfer) द्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होते.

Sanjay Gandhi Yojana Documents: आवश्यक कागदपत्रे

  • अर्जदाराचा आधारकार्ड / मतदान ओळखपत्र (ओळखपत्र)
  • रहिवासी दाखला / राहण्याचा पुरावा
  • जन्मतारीख प्रमाणपत्र (जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला इ.)
  • अपंगत्व प्रमाणपत्र (असल्यास)
  • वैद्यकीय अधिकारी / शासकीय डॉक्टर यांचे प्रमाणपत्र (निराधारतेसाठी)
  • जात प्रमाणपत्र (असल्यास)
  • उत्पन्नाचा दाखला
  • पासपोर्ट साईज फोटो (२-३ नग)
  • बँक पासबुकची झेरॉक्स
  • मृत्यू प्रमाणपत्र (पती/पत्नीचे असल्यास)

Sanjay Gandhi Niradhar yojana Eligibility Criteria: पात्रता

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायम रहिवासी असावा.
  • वय ६५ वर्षांपेक्षा जास्त असलेले निराधार व्यक्ती.
  • १८ वर्षांपेक्षा जास्त वयाचे पूर्णतः अपंग (८०% किंवा त्याहून जास्त) व्यक्ती.
  • कुठलेही कमावते व्यक्ती नसलेले कुटुंब.
  • अर्जदाराचे मासिक उत्पन्न शासनाने निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा कमी असावे.

Sanjay Gandhi Niradhar yojana – Latest GR Download

योजनाचे पैसे कधी पासून येण्यास सुरुवात होईल ?


विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी.बी.टी. पोर्टलद्वारे थेट त्यांच्या आधार संलग्न खात्यात करण्यात येईल. सदरची वाढ ही माहे ऑक्टोबर, २०२५ पासून लागू राहील.

How to Apply: अर्ज कसा करावा?

संजय गांधी निराधार योजनेचा अर्ज करणे अगदी सोपे आहे. खालीलप्रमाणे टप्प्याटप्प्याने प्रक्रिया करून तुम्ही सहज अर्ज करू शकता:

ऑफलाइन पद्धत:

  • सर्वात आधी तुमच्या जवळच्या तहसील कार्यालय, पंचायत समिती किंवा समाजकल्याण कार्यालयात जा.
  • तिथे तुम्हाला या योजनेचा अर्ज फॉर्म मोफत मिळेल.
  • फॉर्म नीट भरताना नाव, पत्ता, जन्मतारीख, आधार क्रमांक ही माहिती काळजीपूर्वक भरा.
  • आवश्यक कागदपत्रे (उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला, अपंगत्व प्रमाणपत्र, बँक पासबुकची प्रत इ.) फॉर्मसोबत जोडा.
  • भरलेला अर्ज तहसीलदार किंवा समाजकल्याण अधिकारी यांच्याकडे जमा करा.
  • एकदा कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाली की, तुमचा अर्ज मंजूर होतो.
  • त्यानंतर दरमहा पेन्शन थेट तुमच्या बँक खात्यात जमा होईल.

ऑनलाईन पद्धत:

  • Aaple Sarkar Portal किंवा महा ई-सेवा केंद्राव लॉगिन करा.
  • तिथे “Sanjay Gandhi Niradhar Yojana” हा पर्याय निवडा.
  • ऑनलाईन फॉर्ममध्ये आवश्यक माहिती भरा आणि कागदपत्रे अपलोड करा.
  • सबमिट केल्यानंतर तुम्हाला अर्ज क्रमांक मिळेल.
  • पडताळणीनंतर पेन्शन थेट खात्यात जमा होईल.

महत्वाची सूचना

  • फॉर्म भरताना चुका होणार नाहीत याची काळजी घ्या.
  • दिलेली बँक खात्याची माहिती अचूक असावी, अन्यथा पैसे जमा होणार नाहीत.
  • जर काही शंका असेल तर तलाठी / ग्रामसेवक / समाजकल्याण अधिकारी यांची मदत घ्या.

Sanjay gandhi niradhar योजनेमध्ये कोण पात्र आहे ?

संजय गांधी निराधार योजनेसाठी निराधार महिला/पुरुष, अंध, अपंग, अनाथ मुले, दुर्बल आजार, घटस्फोट झालेल्या महिला, वेश्या व्यवसायातून मुक्त झालेल्या स्रिया, तृतीयपंथी (Transgender) इत्यादी या योजनेसाठी पात्र आहे.

जर अर्ज नाकारल्यास पुनरावलोकन / तक्रार कशी करावी?

जिल्हा कार्यालय / तहसीलदार कार्यालय / समाजकल्याण विभागात तक्रार दाखल करता येते. Right to Service अधिनियम किंवा RTI वापरून देखील माहिती मागू शकता.

संजय गांधी निराधार योजनेत किती पेन्शन मिळते?

दरमहा ₹1,500, तर अपंगांसाठी २०२५ पासून ₹2,500.

Leave a Comment